PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 21, 2024   

PostImage

६ मुलींचा लैंगिक छळ; अकोल्यात शिक्षकाला बेड्या


 

 

अकोला : उरळ ठाण्याच्या हद्दीतील एका जिल्हा परिषद शाळेत आठव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या सहा मुलींचा लैंगिक छळ करणाऱ्या नराधम शिक्षकाला पोलिसांनी मंगळवारी रात्री बेड्या ठोकल्या. प्रमोद मनोहर सरदार असे त्याचे नाव असून, एका मुलीने तक्रार दिल्यानंतर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

हा शिक्षक गणित व विज्ञान शिकवतो. मे महिन्यात शाळेला सुट्या लागल्यानंतर त्याने काही मुलींना शिकवणीसाठी खोलीवर बोलावले. मुलींना लज्जा निर्माण होईल अशा प्रकारे तो बोलायचा. हा प्रकार मुलींना न पटल्याने त्यांनी शिकवणीला जाणे बंद केले. त्यानंतर जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर संबंधित शिक्षकाने याच मुलींना पुन्हा टार्गेट करीत त्यांचा लैंगिक छळ सुरू केला.

 

मुलींना अश्लील चित्रफीत दाखवून शिक्षकाने विचित्र प्रकारे स्पर्श केला. तसेच त्यांच्याशी अश्लील संभाषण केले. हा प्रकार तो गेल्या चार ते पाच महिन्यांपासून करीत होता, असा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे.

 

विद्यार्थिनींनी हा प्रकार पालकांना सांगितल्यावर संतप्त पालकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.